युनिक विद्यालयात राष्ट्रभाषा दिन उत्साहात साजरा

दि. १४ सप्टें २०२२ ईगल एज्युकेशन सोसायटी संचलित कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर,कात्रज, पुणे येथील युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॅालेज येथे राष्ट्रभाषा हिंदी दिवस उत्साहात साजरा झाला.
१४ सप्टेंबर राष्ट्रभाषा हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी विद्यालयात अतिशय उत्साहाचे वातावरण होते. आजचा परिपाठ हा हिंदी मध्ये घेण्यात आला. हिंदी भाषेचा अभिमान दर्शवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यानी कविता व नाटक सादर केले.
तसेच प्रश्नमंजुषा सारख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात ५ वी ते १२ वी विद्यार्थ्यांचा सहभाग मोलाचा ठरला. कु. निलम भोसले व सौ. अश्विनी हांडे या हिंदी शिक्षिकेनी मुलांना मार्गदर्शन केले व प्रोत्साहन दिले. मुख्याध्यापिका आणि उपमुख्याध्यापिका यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले.
आभार प्रदर्शनानी कार्यक्रमाची सांगता झाली.