
ईगल एज्युकेशन सोसायटी संचलित कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर,कात्रज, पुणे येथील युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॅालेजचे शैक्षणिक वर्ष २०२२ -२३ चे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात गणेश क्रीडा कला मंदिर या ठिकाणी पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. डॅनियल पेनकर डायरेक्टर ऑफ सिंहगड इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, (वडगाव बुद्रुक) तसेच मा. देवांशी गुप्ता ग्लोबल युथ इन्स्फूएन्सर हे लाभले.
या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर.ए. मुलाणी सर, उपाध्यक्ष सोहेल मुलाणी सर, सदस्या डॉ. तस्निम मुलाणी मॅडम, डॉ. जो लोपेज सर डायरेक्टर ऑफ युनिक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री जाधव मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ. सुनिता चांदगुडे मॅडम, तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनात नर्सरी पासून ते इयत्ता १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी देशप्रेम, मातृप्रेम तसेच विविधतेतील एकता दर्शवणाऱ्या गाण्यांवर नृत्य सादरीकरण केले. नर्सरीच्या मुलांनी ‘तेरी ऊंगली पकडके चला’ या गाण्यावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. विविध नृत्याबरोबरच स्वामी विवेकानदांवर आधारित नाटिका ही सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही ठेका धरायला लावणारी काही गाणी मुलांनी सादर केली.
शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची ची मेहनत या कार्यक्रमातून दिसून आली. अतिशय शिस्तप्रिय वातावरणात कार्यक्रम पार पडला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर.ए. मुलाणी सरांनी शिक्षकांचे आणि विद्यार्थ्याचे कौतुक केले.