युनिक स्कूलमध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा

ईगल एज्युकेशन सोसायटी संचलित कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर,कात्रज, पुणे येथील युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॅालेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२ -२३ चा प्रजासत्ताक दिन अतिशय जल्लोषात आणि उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.महेंद्र कावेडिया (M.D) हे लाभले.
या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर.ए. मुलाणी सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री जाधव मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ. सुनिता चांदगुडे मॅडम, तसेच सामाजिक क्षेत्रातील श्री प्रभाकर कदम आणि उत्तम मोरे उपस्थित होते.
सकाळच्या चैतन्यमय वातावरणात शाळेचा परिसर देशप्रेम आणि देशभक्तीने भारावून गेला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यानी आपल्या कलाकृतीतून देशाविषयीचे राष्ट्रप्रेम दाखवून अनेक देशभक्ती पर गीत व नृत्य सादर केले. तसेच पारंपारिक वेशभुषेत लेझीम,मानवी मनोरे व योगा प्रात्यक्षिके सादर केली.
अतिशय शिस्तप्रिय वातावरणात कार्यक्रम पार पडला. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.