सामान्यातुन असामान्य यश

   पुणे : ईगल एज्युकेशन सोसायटी संचलित कात्रज कोंढवा रोड,गोकुळनगर,कात्रज,पुणे येथील युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॅालेजच्या उपमुख्याध्यापिका सौ.सुनिता चांदगुडे मॅडम यांचे चिरंजीव कु.चिराग मच्छिंद्र चांदगुडे यांनी UPSC ची अती कठीण अशी परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण होऊन IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या उच्च पदावर नियुक्ती मिळवली, त्यांच्या या यशासाठी आणि पुढील वाटचालीसाठी युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॅालेज कडून स्वागत समारंभ आयोजित केला होता.त्या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर.ए. मुलाणी सर, संस्थेच्या सदस्या डॉ.तस्निम मुलाणी मॅडम,युनिक इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ.जो लोपेज सर,युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॅालेजच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री जाधव मॅडम, तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग यांनी चिराग यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

   संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर.ए. मुलाणी सरांनी शुभेच्छा देताना विद्यार्थ्यानी असे आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा.असे मार्गदर्शन विद्यार्थ्याना केले.

    ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत करण्याची तयारी असणे गरजेचे आहे.असे मार्गदर्शन कु.चिराग यांनी इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्याना केले.तसेच मेहनत,चिकाटी आणि पालकांचा पाठिंबा यामुळेच आजचे यश मिळाले.असेही ते म्हणाले.

आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.